Buy Raw and Pure Honey Online

Buy Raw and Pure Honey Online
Connecting to your Roots

Thursday, October 27, 2011

भारतीय लंच होम - गिरगाव, चिरा बझार

चर्नी रोड स्टेशन जवळ असलेल्या ठाकुरद्वार नाक्यावरून जगन्नाथ शंकरशेठ रोड वर चालायला सुरुवात केलीत की गंगाराम खत्री वाडीच्या तोंडावरच हे छोटेखानी हॉटेल आहे. फक्त मांसाहारी पदार्थ मिळणाऱ्या ह्या हॉटेल मध्ये अवघे ५-६ पदार्थ मिळतात. पण जे मिळते ते सर्व अमेझिंग आहे.. 
काळ्या मिरीच्या मसाल्यात बनवलेल्या ह्या सर्व डिश काही वेगळ्याच असतात.. इथे स्टार्टर, मेन कोर्स, डेसर्त असली भानगड नाही. डायरेक्ट जेवणावरच ताव मारायचा. चिकन मसाला, कलेजी मसाला, भेजा मसाला, मटन, अंड्याचं ओम्लेट असे मोजकेच पदार्थ.. पण ते बनवण्याची पद्धत लई भारी.. चारही बाजूनी वाहणाऱ्या तेलाकडे मात्र बघत बसू नका. पंजाबी, कोकणी, कोल्हापुरी ह्या कुठल्याच स्टाईल मध्ये न बसणारे हे पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडतील. काळ्या मिरीचा भरपूर वापर करून बनवलेल्या ग्रेवीचा आस्वाद घेताना सुटणारा घाम टिपायला रुमाल मात्र जवळ ठेवा. तेंव्हा एखाद्या रविवारी दुपारी भेट द्या ह्या जागेला आणि मस्त ताव मारा.

Tuesday, October 18, 2011

सत्कार - गोरेगाव

गोरेगाव रेल्वे स्थानकाबाहेर पूर्वेला जे मोठे बस स्थानक आहे त्याच्या समोरच सत्कार हॉटेल आहे. स्वतः शोधण्याच्या भानगडीत पडू नका. सरळ कोणालातरी विचारा.
कारण तुम्हाला स्वतःला ते सापडणं मुश्कील आहे. एका चिंचोळ्या गल्लीत शिरून त्याहून चिंचोळ्या जिन्यावरून पहिल्या मजल्यावर गेलात कि तुम्ही सत्कार मध्ये शिरता..
पोहोचताना नक्की कस हॉटेल आहे अशी शंका मनात येईल पण एकदा इथे जेवलात कि तुम्हाला पटेल 'Narrow is the way which leads to Heaven'.
सत्कार मध्ये शिरताच मासळीच्या सुवासाने तुमच स्वागत होईल. अस्सल मालवणी पध्दतीचे मासे इथे तुम्हाला इथे चाखायला मिळतील.. पापलेट, कोलंबी, सुरमई तर आहेतच पण त्याबरोबर बोंबील, मांदेली, बांगडा, तिसर्या हेही चाखता येईल. गरम गरम वड्यांबरोबर कालवनावर ताव मारा.. इथे चीकनही झक्कास मिळत बर का.. मस्त दोन तीन प्रकारचे फ्राय, मग कालवण वडे आणि सर्व झाल्यावर थंडगार सोलकढी पिऊन इतिश्री करा.
पण इथे फक्त मालवणी पद्धतीचेच पदार्थ मिळतात. तुम्ही मालवणी असाल तर इथे जाऊन घरच्या खाण्याची तुलना करत बसू नका. पण मालवणी नसाल तर मात्र हि तुमच्यासाठी झक्कास मेजवानी ठरेल हे नक्की.  

Check all natural and chemical free traditionally made products here http://indicwisdom.com 

गुडलक कॅफे - एफ सी रोड, पुणे

चितळ्यांचे दुकान, सदाशिव पेठ, प्रभात रोड ह्या ठिकाणांच्या सानिध्यात मांसाहारासाठी फेमस हॉटेल असू शकत असा मुळात मला प्रथम विश्वासच बसला नव्हता.. पण असा हॉटेल फक्त आहेच नाही तर जबरदस्त चालतंय.. गेल्या अनेक दशकांपासून हे हॉटेल इथे आहे.. पिढ्या बदलल्या पुणे बदललं, पण इथली गर्दी मात्र तशीच आहे.. बाहेरून डोकावलं तर अगदी टिपिकल इराणी हॉटेल आहे.. पण इथले पदार्थ म्हणजे अहाहा.. गोल्डन भेजा फ्राय, बिर्याणी, मटण कटलेत, चीकेन चिल्ली, खिमा असे एकापेक्षा एक सरस पदार्थ तुमची पावलं पुन्हा पुन्हा इथे वळवतील..
ह्या हॉटेल मधले स्प्रीन्कलर्स हा अजून एक कुतूहलाचा विषय आहे. जेव्हा कधी जाल त्या वेळी पुण्यातली तरुणाई इथे ताव मारताना तुम्हाला दिसेल. तेंव्हा पुढच्या वेळी जेंव्हा पुण्यात असाल तेंव्हा कॅफे गुडलक ला भेट द्यायला विसरू नका.  

सरदार प्रीतम सिंग का विशाल मशहूर धाबा .. अंबाला केंट

हि जागा आणि जागेचा नाव दोन्ही गोष्टी भन्नाट आहेत.. अंबाला केंट रेल्वे स्थानकापासून अगदी जवळच बस स्थानकाला लागून हा धाबा आहे.  सरदार प्रीतम सिंग ह्यांनी ४० वर्षापूर्वी सुरु केलेला धाबा इतका फेमस झाला कि सर्व जण त्यांचे नाव वापरू लागले. त्यामुळे ह्या जागी तुम्हाला प्रीतम सिंग नावाचे बरेच धाबे आढळतील त्यामुळे वरचे नाव नीट लक्षात ठेवा.
फार स्वछताप्रेमी असाल तर मात्र कदाचित तुम्ही येथे खाणार नाही.. पण इथला आलू प्याज पराठा आणि दही खाल्ल्यावर तो कळकट्ट धाबा सुद्धा तुम्हाला स्वर्गासामान वाटू लागेल.
इथले चिक्कण देखील अप्रतिम आहे.. धाब्याचा मेनू फार मोठा नाही काही ठराविक पण अतीव रुचकर पदार्थ तुम्हाला इथे चाखायला मिळतील.. तेंव्हा कधी अंबाला केंट भागात गेलात तर सकाळची न्याहारी इथे करायला विसरू नका. हा धाबा फक्त दुपारी ३ पर्यंतच उघडा असतो त्यामुळे संध्याकाळी येथे जाऊन फायदा नाही.

Monday, May 23, 2011

रावत मिष्टान भांडार - जोधपुर


भारतीय लोक राजस्थान ची ट्रीप एकदा तरी करतातच, आणि ह्या ट्रिपचा जोधपुर हा एक महत्वाचा बिंदू आहे. त्यामुळे जेंव्हा कधी तुम्ही राजस्थानची ट्रीप प्लान कराल आणि त्यातही जोधपूरला पोहोचाल तेंव्हा रावत मिष्टान भांडार ला भेट द्यायला विसरू नका. आणि तुमचा दिवस सुरु होतानाच नाश्ता करायला इथे जरूर जा.
इथली प्याज कचोरी, मावा कचोरी, गजक, घेवर हे सर्व तुडुंब भरून घ्या आणि मगच जोधपूरचा सुंदर किल्ला बघायला पुढे जा. प्याज कचोरी हि आपण जी दही कचोरी किंवा राज कचोरी खातो तशीच दिसायला असते.. (मुंबईत गोरेगावला सुरभी मध्ये तुम्ही हि खाऊ शकता). ह्यात चटणी आणि शेव घालून ह्या गरमा गरम काचोरीवर ताव मारा. बाकी सर्व पदार्थ गोड आहेत. 
गजक हे तिलापासून बनवतात आणि ते बरेच दिवस टिकू शकते, त्यामुळे तुम्हाला आवडलं तर pack करून बरोबर आणू शकता. घेवर हा जाळीदार डिश सारखा दिसतो आणि खायला फार खमंग लागतो. आणि मावा कचोरी हि प्याज काचोरीचीच गोड बहिण आहे. पण तीदेखील इथली स्पेकिअलित्य म्हणून नक्की खा.
खूपच गोड खाल्लं असं वाटलं तर इथे मिरची वडा सुद्धा चांगला मिळतो, तो खाऊन चव balance करू शकता. जोधपुरच्या लोकांची नाश्त्याची हि आवडती जागा असावी, कारण नेहेमीच गर्दीने फुललेली असते आणि मुख्य रस्त्यावरच असल्याने इथपर्यंत पोहोचायला फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. मग आता जोधपूरला गेलात कि station road वर असलेल्या ह्या ठिकाणी हादडायला जा आणि कसा वाटल ते मलाही कळवा.

Thursday, May 19, 2011

मामलेदार कचेरी मिसळ - ठाणे

ठाणे स्टेशन च्या जवळच मामलेदार कचेरी आहे. ह्या कचेरीला अगदी खेटून असल्याने ह्या मिसळीच नाव मामलेदार कचेरीची मिसळ. तसा ह्या हॉटेल मध्ये बरेच पदार्थ मिळत असावेत, पण अनेकदा जाऊनही मी मिसलीशिवाय कुठे पाहिलंच नाहीये. तुम्ही पण तेच करा नाहीतर तुम्ही नवखे आहात हे सर्वांना कळेल. हि बेस्ट मिसळ आहे का वगैरे वादात मी पडणार नाही. पण इथली मिसळ प्रत्येक खावाय्याने खायलाच हवी..
मस्त तिखट मिसळ आणि त्यावर लाले लाल तरी, वर भरपूर कांदा अशी मिसळ जमवा आणि मित्रांबरोबर त्यावर ताव मारा.. हे हॉटेल तसं छोट आणि साधंच आहे. त्यामुळे तुम्ही फारच status cautious असाल, किंवा एकाच बाकड्यावर ४ विविध अनोळखी लोकांनी बसून खाणं तुम्हाला आवडत नसेल तर बाहेरच्या लाईन मधून parcel घ्या आणि घरी जाऊन मिसळीचा आस्वाद घ्या, पण मिसळ खा जरूर..
मिसळीचा मिजाज जरा गरमच असल्याने सवय नसेल तर कमी तिखट 'तरी' घ्या.. नाहीतर माझ्या नावाने शंख कराल..
मग आता जेंव्हा कधी ठाण्याला जाल तेंव्हा हि मिसळ नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी वाटली ते..  
BTW ज्यांना 'तरी' म्हणजे काय हे माहित नसेल त्यांच्या माहितीसाठी, मिसळीमध्ये उसळ, बाबत्याचा ठेचा, फरसाण आणि कांदा असे components असतात.. आणि ह्याचं मिश्रण तयार झाल्यावर त्याच्यावर एक झणझणीत रस्सा ओततात.. हा रस्सा मिसळीची मजा अजूनच वाढवतो, अश्या ह्या रस्ष्याला 'तरी' म्हणतात 

हाजीअली ज्यूस सेंटर

तुम्ही हाजीअलीला गेला असाल तर तुम्ही इथे गेला असणारच ह्याची मला पक्की खात्री आहे. पण गेला नसाल तर इथे नक्की ब हेत द्या. हाजीअलीचा जो मुख्य signal आहे तिथे हे प्रशस्त juice center आहे. रात्री drive ला जाऊन इथे गाडी लावा आणि juice, pizza, sandwich, पावभाजी ह्यांचा मनसोक्त आस्वाद घ्या. विशेषतः pizza नक्की खा.. पण domino, pizza hut वगैरे मध्ये खाल्लेलं विसरून इथे pizza खा.. कारण इथला pizza म्हणजे एकदम घरगुती..
आणि बाकी काहीही आणि कितीही खाल्लत तरी पोटात थोडी(?) जागा ठेवा इथल cream खायला. इथे लीची, सीताफळ, आंबा अश्या विविध फळांच cream मिळत, जे केवळ अप्रतिम आहे .. हाजीअलीच्या साक्षीने दुसऱ्या दिवसापासून व्यायाम करण्याचा संकल्प सोडा, आणि ह्या fresh cream वर ताव मारा..
हे juice center रात्री एक वाजे पर्यंत उघड असतं. त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर cream खायची हुक्की  आली तरी बिनधास्त इथे जा आणि एन्जोय करा ...

Wednesday, May 18, 2011

काके दा हॉटेल - कॅनॉट प्लेस दिल्ली


कॅनॉट प्लेसच्या अगदी जवळ, म्युनिसिपल मार्केट मध्ये हे छोटेखानी हॉटेल आहे. बाहेरून बघून कदाचित तुम्हाला आत जाऊ कि नको असा प्रश्न पडेल.. पण आत जाच..
अगदी टिपिकल पंजाबी हॉटेल आहे आणि maximum १०-१२ dishes इथे मिळतात.. पण सगळ्याच्या सगळ्या एकदा तरी चाखल्याशिवाय इथली खाद्यभ्रमंती पूर्ण होणार नाही.
मी इथे २-३ वेळा जाऊन भेजा, कपुरे, खिमा, कबाब आणि कलेजी taste केलं. सर्वच पदार्थ अप्रतिम होते.. तंदूर देखील झकास रुमाली रोटी खा, किंवा नान सगळंच अप्रतिम. 
तुम्ही red meat खात नसाल तरी हरकत नाही, चिकन मध्ये सुद्धा तुम्हाला चांगली ग्रेवी, किंवा कबाब खायला मिळतील.. पण तुम्हाला खाण्याच्या चवीपेक्षा ambiance, hygine वगैरे जास्त प्रिय असेल तर मात्र तुम्हाला कदाचित हे हॉटेल आवडणार नाही. पण तुम्ही अस्सल खवय्ये असाल तर मात्र इथल्या लाजवाब डिशेस खायला जरूर जाच.. मला खात्री आहे इथली चव तुमच्या जिभेवर फार काळ रेंगाळत राहील ह्यात शंका नाही.. मग मारा ताव आणि मला पण कळवा, एखादी डिश राहून गेली असेल तर.   

Sunday, July 4, 2010

पतीला पंजाबी तड़का - गोरेगाव

गोरेगाव लिंक रोड वर असलेल्या chroma शोरुम च्या वर पहिल्या मजल्यावर हे छोटेखानी रेस्टोरंट आहे .. खरतर ह्या ठिकाणी तुम्हाला on the toes, kareem, machaan असे इतरही options मिळतील पण सध्या मी पतीला बद्दल सांगतो...
शाकाहारी खाण्यासाठी ही जागा OK OK आहे.. पण तुम्ही मांसाहारी खाण्याचे आणि especially कबाब चे fan असाल तर इथे भेट द्यायला काहीच हरकत नाही... frankly करीम पेक्षा इथल food मला जास्त आवडल..
मी कबाब, पाया सूप, नल्ली ग्रेवी, मटन बिरयानी, फिरनी, कबाब प्लेटर आणि चिकन लाहोरी तरी केल आणि चिकेन लाहोरी सोडून कशानेच नीरस केला नाही.. फ़ूड अप्रतीम नसल तरी तुम्हाला उगाच आलो असा नक्कीच वाटणार नाही
service & ambiance खरच चांगला आहे...
एकंदरीत फार मेहेनत करून येण्यासारख नसल तरी आसपास असाल तर एकदा नक्कीच ट्राय करण्यासारख नक्कीच आहे..

Wednesday, May 12, 2010

विठ्ठल कामत - महाड

मुंबईहून गोवा किंवा कोकणात जातानाचा पनवेल किंवा वडखळ नंतरचा हा थांबा चुकवू नका. महाड ओलांडल्यावर अगदी काही मिनिटांत डाव्या हाताला कामतांच हे हॉटेल तुमच्या स्वागताला सज्ज दिसेल .
पार्किंगसाठी भरपूर मोकळी जागा, बसण्याची चांगली सोय, नाश्ता व जेवणाचे भरपूर पर्याय आणि लांबच्या प्रवासातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छ स्वच्छतागृह ह्या सर्व गोष्टी इथे एकाच ठिकाणी आहेत.
इथे दक्षिणात्य पदार्थ छान मिळत असले तरी विठ्ठल वडा आणि बटाटेवडा खायला मात्र विसरू नका. विठ्ठल वडा हा देखील बटाटेवडाच पण दह्यात घातलेला. इथल्या वड्याबरोबर मिळणाऱ्या तीन प्रकारच्या चटण्याही लई भारी असतात. फार लांबचा पल्ला गाठायचा असेल तर इथे खायला थांबच कारण ह्या महामार्गावर नंतर फार चांगला हॉटेल लगेच लागत नाही.

श्रीदत्त कॉर्नर - पळस्पे फाटा

तुम्ही खाजगी वाहनाने कोकणात गेला असाल तर ह्या जागेविषयी वाचायची गरजच नाही. इथला वडा, मिसळ, शिरा, खरवस काही न काही तुम्ही खाल्लच असेल.
पनवेल पासून साधारण ३-४ कि मी पुढे गेल्यावर पुणे आणि गोव्याकडे जाणारे रस्ते जिथे वेगळे होतात त्या फाट्यावर श्रीदत्त कॉर्नर आहे.
सकाळ सकाळ कोकणात जायला निघणाऱ्या गाड्यांच हे ठरलेल नाश्त्याच ठिकाण. मग २ तासाचा प्रवास झाल्यावर हवाहवासा ब्रेक घेत सर्वच जन इथे थांबतात.
कोणी चहा घेत फ्रेश होत तर कोणी वडा, शिरा किंवा मिसळीवर ताव मारत. इथला खर्वसही छान असतो. हो पण खरवस मागितल्यावर भरपूर मिळेल अशी अपेक्षा मात्र ठेऊ नका :)
आणि पुढच्या प्रवासात खायला चकल्या, चिवडा आणि असेच काही पदार्थही येथून घेऊन निघता येईल तर मग पुढल्या वेळी कोकणात जाताना पनवेल पार केल्यावर ह्या कॉर्नरला थांबायला विसरू नका..

मुन्ना अन्डेवाला - दहिसर लिंक रोड

लिंक रोड दहिसरला जिथे संपतो त्याच्या दोनतीनशे मीटर्स अलीकडे डाव्या हाताला मुन्ना अन्डेवाल्याची टपरी आहे. इथे येऊन एकदा सर्व डिश ट्राय केल्याशिवाय अंड्यातून काय काय बनू शकते ते समजणार नाही. पहिल्यांदा भुर्जी किंवा ओमलेट खाऊ म्हणून आत शिरलेला माणूस मेनुकार्ड बघून थोडा गोंधळतो. चांगल्या १५-२० डिशेसची यादी तुम्हाला दिसते.
ओमलेट, भुर्जी, बोईल्ड एग ह्याशिवाय
अंड्याचा डोसा,
खिमा घोटाळा,
चीज हाफ फ्राय,
मसाला हाफ फ्राय,
राणी भुर्जी,
फ्रेंच टोस्ट असे अनेक पदार्थ नजरेस पडतात, आणि मग काय? मस्त मित्रांचा घोळका आणि एकानंतर एक येणारे गरमागरम पदार्थ अशी छान मैफिल जमते. ग्रुप मध्ये कोणाची गाडी असेल ती घेऊन मित्रांबरोबर या आणि गाडीच्या बोनेतवरच मस्त मैफिल जमवून सर्व पदार्थांचा आस्वाद घ्या. पण हो, इथे खायचं असेल तर ११ च्या आत यावा लागेल हे मात्र लक्षात ठेवा.
मग काय मोबाईल उचला मित्रांना कॉल करा आणि मुन्ना कडे मैफिलीचा बेत आखून टाका.

झाफरान मुघलाई खाण्याची मक्का

महात्मा फुले मंडई (crowford market) च्या अगदी बाजूलाच असलेलं हे छान हॉटेल म्हणजे मुघलाई पदार्थांच्या चाहत्यांसाठी स्वर्गच.. विशेष म्हणजे हे हॉटेल रात्रभर चालू असत.
किंबहुना रात्री दीड वाजला आणि pubs  बंद झाले कि इथला माहौलच बदलून जातो. बिर्याणी, कबाब, फिरनी, lobster, अशा अनेक पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर झाफरानला भेट द्यायलाच हवी.
वेगवेगळ्या मुघलाई दिशेस इथे मिळत असल्या तरी सर्वात भारी प्रकार म्हणजे रान बिर्याणी.. बकऱ्याच्या अक्ख्या पायाची ही बिर्याणी ऐकायला विचित्र वाटेल कदाचित पण एकदा खाल्लीत तर पुन्हा पुन्हा झाफारनकडे  तुमचे पाय आपोआपच वळायला लागतील.. पण एकटे किंवा जोडीने गेलात तर मात्र ही दिश मागवू नका, कारण एक रान बिर्याणी ४ जणांना तरी पुरते.
इथला खिमा पण नक्की तरी करा, आणि सर्वात मुख्य म्हणजे फिरनी न खाता बाहेर पडून समस्त खवय्या जमातींचा अपमान करू नका.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे मिळणारा मुखवास.. खायचे पान आणि त्यात घालायचा सर्व मसाला वाळवून केलेला मुखवास ही झाफरान ची अजून एक खासियत. तर असे हे हॉटेल तुमच्या ह्या वीकेंड च्या लिस्ट वर टाका आणि इथलं खाणं कसं वाटल ते मलाहीकळवा

Tuesday, May 11, 2010

गिरगावातले खाणीमान

एखाद्या जागेला जसे राहणीमान असते तसेच त्या जागेची बरेचदा खाद्यसंस्कृतीही असते. मग तो भाग भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा असण्याची गरज नाही. गिरगावातले खाणीमानही असेच वेगळे आहे. कोकणातून आलेला ब्राह्मणवर्ग मुख्यता इथे वसला आणि त्यांच्या जोडीला नरीमन पोईन्ट  च्या भागात वसले पारशी. पुढे गुजराती लोकांच्या आगमनानंतर इथे ह्या तीनही संस्कृतींच्या संगमातून एक खाद्यसंस्कृती तयार झाली आहे. इराण्याचे हॉटेल, ब तांबे, विनय लंच होम, कोल्हापुरी चिवडा, सांडू, आइडिअल, कोना, आनंदाश्रम हि येथील खाद्यसंस्कृतीची काही प्रमुख केंद्रे शिवाय प्रकाश, कुटुंबसखी हि अनेक गीरगावाकारांना nostalgic करणारी ठिकाण आहेतच..
विनय ची उसळ आणि मिसळ, इराण्याचा ब्रून मस्का, ओमलेट, मावा सामोसा आणि पुडिंग, कुटुंबसखीचा वडा, शिरा आणि पोहे, कोल्हापुरीची उपासाची मिसळ, ताराबागेतील पाणीपुरी आणि प्रकाशचे पियुष अशा अनेक पदार्थांनी हि खाद्यसंस्कृती बहरली आहे.
तेंव्हा मुंबईत कुठे जायच आणि काय खायचं हा प्रश्न पडेल तेंव्हा सरळ गिरगावात या आणि ह्या खाद्यसंस्कृतीचा आणि त्याबरोबर चालसंस्कृतीचा आस्वाद घ्या ..