Buy Raw and Pure Honey Online

Buy Raw and Pure Honey Online
Connecting to your Roots

Tuesday, May 11, 2010

गिरगावातले खाणीमान

एखाद्या जागेला जसे राहणीमान असते तसेच त्या जागेची बरेचदा खाद्यसंस्कृतीही असते. मग तो भाग भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा असण्याची गरज नाही. गिरगावातले खाणीमानही असेच वेगळे आहे. कोकणातून आलेला ब्राह्मणवर्ग मुख्यता इथे वसला आणि त्यांच्या जोडीला नरीमन पोईन्ट  च्या भागात वसले पारशी. पुढे गुजराती लोकांच्या आगमनानंतर इथे ह्या तीनही संस्कृतींच्या संगमातून एक खाद्यसंस्कृती तयार झाली आहे. इराण्याचे हॉटेल, ब तांबे, विनय लंच होम, कोल्हापुरी चिवडा, सांडू, आइडिअल, कोना, आनंदाश्रम हि येथील खाद्यसंस्कृतीची काही प्रमुख केंद्रे शिवाय प्रकाश, कुटुंबसखी हि अनेक गीरगावाकारांना nostalgic करणारी ठिकाण आहेतच..
विनय ची उसळ आणि मिसळ, इराण्याचा ब्रून मस्का, ओमलेट, मावा सामोसा आणि पुडिंग, कुटुंबसखीचा वडा, शिरा आणि पोहे, कोल्हापुरीची उपासाची मिसळ, ताराबागेतील पाणीपुरी आणि प्रकाशचे पियुष अशा अनेक पदार्थांनी हि खाद्यसंस्कृती बहरली आहे.
तेंव्हा मुंबईत कुठे जायच आणि काय खायचं हा प्रश्न पडेल तेंव्हा सरळ गिरगावात या आणि ह्या खाद्यसंस्कृतीचा आणि त्याबरोबर चालसंस्कृतीचा आस्वाद घ्या ..

1 comment:

  1. पोस्ट वाचून तोंडाला पाणी सुटले. कौस्तुभ, मला येथे गिरगाव मधील आपल्या सर्वांचा आवडता वडा-पावाचा पण उल्लेख करावासा वाटतो. अजूनही धोबी-वाडीतला वडा-पाव, बोरकर चा वडा-पाव, परशुराम वाडीतील जोश्यांचा वडा -पाव आठवले की तोंडाला पाणी सुटते. या व्यतिरिक्त "पाटील ज्यूसवाला" देखील माझे आवडते ठिकाण होते. त्याचे पहिले कारण म्हणजे सिझनल फळांचे ज्यूस व मिल्क शेक्स आणि दुसरं कारण म्हणजे एक ग्लास ज्यूस मागितल्यावर तो नेहमी दीड ग्लास द्यायचा म्हणून.

    ReplyDelete