Buy Raw and Pure Honey Online

Buy Raw and Pure Honey Online
Connecting to your Roots

Thursday, October 27, 2011

भारतीय लंच होम - गिरगाव, चिरा बझार

चर्नी रोड स्टेशन जवळ असलेल्या ठाकुरद्वार नाक्यावरून जगन्नाथ शंकरशेठ रोड वर चालायला सुरुवात केलीत की गंगाराम खत्री वाडीच्या तोंडावरच हे छोटेखानी हॉटेल आहे. फक्त मांसाहारी पदार्थ मिळणाऱ्या ह्या हॉटेल मध्ये अवघे ५-६ पदार्थ मिळतात. पण जे मिळते ते सर्व अमेझिंग आहे.. 
काळ्या मिरीच्या मसाल्यात बनवलेल्या ह्या सर्व डिश काही वेगळ्याच असतात.. इथे स्टार्टर, मेन कोर्स, डेसर्त असली भानगड नाही. डायरेक्ट जेवणावरच ताव मारायचा. चिकन मसाला, कलेजी मसाला, भेजा मसाला, मटन, अंड्याचं ओम्लेट असे मोजकेच पदार्थ.. पण ते बनवण्याची पद्धत लई भारी.. चारही बाजूनी वाहणाऱ्या तेलाकडे मात्र बघत बसू नका. पंजाबी, कोकणी, कोल्हापुरी ह्या कुठल्याच स्टाईल मध्ये न बसणारे हे पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडतील. काळ्या मिरीचा भरपूर वापर करून बनवलेल्या ग्रेवीचा आस्वाद घेताना सुटणारा घाम टिपायला रुमाल मात्र जवळ ठेवा. तेंव्हा एखाद्या रविवारी दुपारी भेट द्या ह्या जागेला आणि मस्त ताव मारा.

Tuesday, October 18, 2011

सत्कार - गोरेगाव

गोरेगाव रेल्वे स्थानकाबाहेर पूर्वेला जे मोठे बस स्थानक आहे त्याच्या समोरच सत्कार हॉटेल आहे. स्वतः शोधण्याच्या भानगडीत पडू नका. सरळ कोणालातरी विचारा.
कारण तुम्हाला स्वतःला ते सापडणं मुश्कील आहे. एका चिंचोळ्या गल्लीत शिरून त्याहून चिंचोळ्या जिन्यावरून पहिल्या मजल्यावर गेलात कि तुम्ही सत्कार मध्ये शिरता..
पोहोचताना नक्की कस हॉटेल आहे अशी शंका मनात येईल पण एकदा इथे जेवलात कि तुम्हाला पटेल 'Narrow is the way which leads to Heaven'.
सत्कार मध्ये शिरताच मासळीच्या सुवासाने तुमच स्वागत होईल. अस्सल मालवणी पध्दतीचे मासे इथे तुम्हाला इथे चाखायला मिळतील.. पापलेट, कोलंबी, सुरमई तर आहेतच पण त्याबरोबर बोंबील, मांदेली, बांगडा, तिसर्या हेही चाखता येईल. गरम गरम वड्यांबरोबर कालवनावर ताव मारा.. इथे चीकनही झक्कास मिळत बर का.. मस्त दोन तीन प्रकारचे फ्राय, मग कालवण वडे आणि सर्व झाल्यावर थंडगार सोलकढी पिऊन इतिश्री करा.
पण इथे फक्त मालवणी पद्धतीचेच पदार्थ मिळतात. तुम्ही मालवणी असाल तर इथे जाऊन घरच्या खाण्याची तुलना करत बसू नका. पण मालवणी नसाल तर मात्र हि तुमच्यासाठी झक्कास मेजवानी ठरेल हे नक्की.  

Check all natural and chemical free traditionally made products here http://indicwisdom.com 

गुडलक कॅफे - एफ सी रोड, पुणे

चितळ्यांचे दुकान, सदाशिव पेठ, प्रभात रोड ह्या ठिकाणांच्या सानिध्यात मांसाहारासाठी फेमस हॉटेल असू शकत असा मुळात मला प्रथम विश्वासच बसला नव्हता.. पण असा हॉटेल फक्त आहेच नाही तर जबरदस्त चालतंय.. गेल्या अनेक दशकांपासून हे हॉटेल इथे आहे.. पिढ्या बदलल्या पुणे बदललं, पण इथली गर्दी मात्र तशीच आहे.. बाहेरून डोकावलं तर अगदी टिपिकल इराणी हॉटेल आहे.. पण इथले पदार्थ म्हणजे अहाहा.. गोल्डन भेजा फ्राय, बिर्याणी, मटण कटलेत, चीकेन चिल्ली, खिमा असे एकापेक्षा एक सरस पदार्थ तुमची पावलं पुन्हा पुन्हा इथे वळवतील..
ह्या हॉटेल मधले स्प्रीन्कलर्स हा अजून एक कुतूहलाचा विषय आहे. जेव्हा कधी जाल त्या वेळी पुण्यातली तरुणाई इथे ताव मारताना तुम्हाला दिसेल. तेंव्हा पुढच्या वेळी जेंव्हा पुण्यात असाल तेंव्हा कॅफे गुडलक ला भेट द्यायला विसरू नका.  

सरदार प्रीतम सिंग का विशाल मशहूर धाबा .. अंबाला केंट

हि जागा आणि जागेचा नाव दोन्ही गोष्टी भन्नाट आहेत.. अंबाला केंट रेल्वे स्थानकापासून अगदी जवळच बस स्थानकाला लागून हा धाबा आहे.  सरदार प्रीतम सिंग ह्यांनी ४० वर्षापूर्वी सुरु केलेला धाबा इतका फेमस झाला कि सर्व जण त्यांचे नाव वापरू लागले. त्यामुळे ह्या जागी तुम्हाला प्रीतम सिंग नावाचे बरेच धाबे आढळतील त्यामुळे वरचे नाव नीट लक्षात ठेवा.
फार स्वछताप्रेमी असाल तर मात्र कदाचित तुम्ही येथे खाणार नाही.. पण इथला आलू प्याज पराठा आणि दही खाल्ल्यावर तो कळकट्ट धाबा सुद्धा तुम्हाला स्वर्गासामान वाटू लागेल.
इथले चिक्कण देखील अप्रतिम आहे.. धाब्याचा मेनू फार मोठा नाही काही ठराविक पण अतीव रुचकर पदार्थ तुम्हाला इथे चाखायला मिळतील.. तेंव्हा कधी अंबाला केंट भागात गेलात तर सकाळची न्याहारी इथे करायला विसरू नका. हा धाबा फक्त दुपारी ३ पर्यंतच उघडा असतो त्यामुळे संध्याकाळी येथे जाऊन फायदा नाही.