Buy Raw and Pure Honey Online

Buy Raw and Pure Honey Online
Connecting to your Roots

Thursday, May 19, 2011

हाजीअली ज्यूस सेंटर

तुम्ही हाजीअलीला गेला असाल तर तुम्ही इथे गेला असणारच ह्याची मला पक्की खात्री आहे. पण गेला नसाल तर इथे नक्की ब हेत द्या. हाजीअलीचा जो मुख्य signal आहे तिथे हे प्रशस्त juice center आहे. रात्री drive ला जाऊन इथे गाडी लावा आणि juice, pizza, sandwich, पावभाजी ह्यांचा मनसोक्त आस्वाद घ्या. विशेषतः pizza नक्की खा.. पण domino, pizza hut वगैरे मध्ये खाल्लेलं विसरून इथे pizza खा.. कारण इथला pizza म्हणजे एकदम घरगुती..
आणि बाकी काहीही आणि कितीही खाल्लत तरी पोटात थोडी(?) जागा ठेवा इथल cream खायला. इथे लीची, सीताफळ, आंबा अश्या विविध फळांच cream मिळत, जे केवळ अप्रतिम आहे .. हाजीअलीच्या साक्षीने दुसऱ्या दिवसापासून व्यायाम करण्याचा संकल्प सोडा, आणि ह्या fresh cream वर ताव मारा..
हे juice center रात्री एक वाजे पर्यंत उघड असतं. त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर cream खायची हुक्की  आली तरी बिनधास्त इथे जा आणि एन्जोय करा ...

2 comments:

  1. हाजी अली ज्यूस सेंटर बद्दल खूप ऐकला आहे. पण टेस्ट केलं नाही अजून. कौस्तुभ, तुमच्या इथे नवीन Dominos उघडलं आहेना?

    ReplyDelete
  2. नवीन domino आणि mcdonalds पण.. मला mcdonalds चा breakfast ट्राय करायचा आहे.

    ReplyDelete