Buy Raw and Pure Honey Online

Buy Raw and Pure Honey Online
Connecting to your Roots

Thursday, May 19, 2011

मामलेदार कचेरी मिसळ - ठाणे

ठाणे स्टेशन च्या जवळच मामलेदार कचेरी आहे. ह्या कचेरीला अगदी खेटून असल्याने ह्या मिसळीच नाव मामलेदार कचेरीची मिसळ. तसा ह्या हॉटेल मध्ये बरेच पदार्थ मिळत असावेत, पण अनेकदा जाऊनही मी मिसलीशिवाय कुठे पाहिलंच नाहीये. तुम्ही पण तेच करा नाहीतर तुम्ही नवखे आहात हे सर्वांना कळेल. हि बेस्ट मिसळ आहे का वगैरे वादात मी पडणार नाही. पण इथली मिसळ प्रत्येक खावाय्याने खायलाच हवी..
मस्त तिखट मिसळ आणि त्यावर लाले लाल तरी, वर भरपूर कांदा अशी मिसळ जमवा आणि मित्रांबरोबर त्यावर ताव मारा.. हे हॉटेल तसं छोट आणि साधंच आहे. त्यामुळे तुम्ही फारच status cautious असाल, किंवा एकाच बाकड्यावर ४ विविध अनोळखी लोकांनी बसून खाणं तुम्हाला आवडत नसेल तर बाहेरच्या लाईन मधून parcel घ्या आणि घरी जाऊन मिसळीचा आस्वाद घ्या, पण मिसळ खा जरूर..
मिसळीचा मिजाज जरा गरमच असल्याने सवय नसेल तर कमी तिखट 'तरी' घ्या.. नाहीतर माझ्या नावाने शंख कराल..
मग आता जेंव्हा कधी ठाण्याला जाल तेंव्हा हि मिसळ नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी वाटली ते..  
BTW ज्यांना 'तरी' म्हणजे काय हे माहित नसेल त्यांच्या माहितीसाठी, मिसळीमध्ये उसळ, बाबत्याचा ठेचा, फरसाण आणि कांदा असे components असतात.. आणि ह्याचं मिश्रण तयार झाल्यावर त्याच्यावर एक झणझणीत रस्सा ओततात.. हा रस्सा मिसळीची मजा अजूनच वाढवतो, अश्या ह्या रस्ष्याला 'तरी' म्हणतात 

2 comments:

  1. वा !!!! तोंडाला पाणी सुटले..

    ReplyDelete
  2. मी अनेक वेळा टेस्ट केली आहे . अप्रतिम अशी चव आहे

    ReplyDelete